तामिळनाडू : मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान अपघात; क्रेन उलटल्याने चौघांचा मृत्यू

चेन्नई, २३ जानेवारी २०२३ : तामिळनाडूच्या अरक्कोनम शहरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम येथील नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात उत्सवादरम्यान क्रेन उलटून चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम भागात असलेल्या नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात परिसरातील अनेक गावातील लोक जमले होते. मायलेरू नावाच्या सणाबद्दल खूप उत्साह होता आणि मंडिअम्मन मंदिरात लोकांची मोठी गर्दी झाली होती. प्रथेनुसार लोक क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यानुसार मुथू कुमार, बूपलन आणि जोठी बाबू हे देखील क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, अचानक तिघेही ज्या क्रेनला पुष्पहार घालण्यासाठी लटकले होते, पण ती क्रेन अचानक खाली कोसळली. अजून एका नागरिकाची ओळख पटली नसून, यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

  • घटनेचा व्हिडिओ व्हायरल

घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्रेन उलटताच घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. अनेक जण पळून जाण्यात यशस्वी झाले तर नऊ जण या अपघातात जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, या अपघाताचा पुढील तपास सुरु केला आहे.

राणीपेठचे जिल्हाधिकारी भास्कर पंडियन यांनी सांगितले की, क्रेन वापरण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती किंवा तशी पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती. दरम्यान, क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा