कळंब, दि१६मे २०२० : कोरोना विषाणूने उस्मानाबाद जिल्ह्यात शिरकाव केला आहे. कळंब तालुक्यात कोरोनाचे तब्बल ३ रूग्ण आढळून आले. हे समजताच सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने याबाबतचे गांभीर्य ठेऊन कोरोना रूग्ण असलेले परिसर तसेच गाव सील केले आहे.
आपल्या जवळील शहरात कोरोना रूग्ण आढळून आल्याने तांदूळवाडी या गावातील सरपंच दिपाली नितीन काळे यांनी खबरदारी बाळगून आज दि.१६ मे रोजी पंचायत समिती कळंब आणि तांदूळवाडी या गावात निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली .
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड












































