‘तंगड्या तोडण्याची भाषा करू नका’: संजय राऊत

मुंबई : ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून शिवसेना-भाजपमधील शाब्दिक युद्ध चांगलेच तापत असल्याचे दिसून येत आहे.
‘उदयनराजे यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीवर शिवसेना खासदार संजय राऊत प्रत्युत्तर दिले आहे.
‘छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो. मात्र तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या प्रत्येकाला असतात,’ असेही राऊत यांनी उदयनराजेंना सुनावले आहे.
मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपली भूमिका मांडली.
‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमधील शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती.
पक्षाचे नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारले होते का, असे उदयनराजे यांनी म्हटले होते. उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. या वक्तव्याने राजकारण तापलेले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा