तर रद्द होऊ शकते अजित पवारांची आमदारकी?

122

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भाजपसोबत घरोबा करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.तसेच आमदारांच्या सह्यांचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. यामुळे राष्ट्रवादीने अजित पवार यांची राष्ट्रवादी ने हकालपट्टी केली. त्यामुळे अजित पवारांसमोर पेच निर्माण झाला आहे.
अजित पवारांनी बहुमत सिद्ध करताना राष्ट्रवादीविरोधात मतदान केल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होण्याचा धोका आहे. अजित पवार यांनी दोन तृतीयांश समर्थक आमदारांना घेऊन पक्षांतर केलेले नाही. यामुळे त्यांना हा कायदा लागू होतो.
अजित पवार यांच्यासोबत गेलेले बहुतांश आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतलेले आहेत. यामुळे अजित पवारांना ५४ पैकी ३६आमदारांचे समर्थन मिळविणे गरजेचे आहे. शरद पवारांनी केलेले डॅमेज कंट्रोल पाहता अजित पवार यांना ते शक्य दिसत नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा