मुंबई : खासदार संजय राऊत यांनी ‘मी दाऊद इब्राहिमला अनेकदा भेटलोय, त्याला दम भरलाय…असे वक्तव्य बुधवारी पुण्यात केले होते. याच वाक्याचा संदर्भ घेऊन निलेश राणे यांनी खालील आशयाचे ट्वीट केलं आहे.
ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, खूप दिवसांनी चांगला जोक वाचला. मला माहित नाही नवीन कायदा काय आहे पण ‘पिसाळलेल्या कुत्र्या’ला गोळी मारायचा नियम असता तर संज्या संपला असता. संज्या सारखा लुक्का दाऊदला दम भरायला लागला म्हणून दाऊद संपला. संज्या आताच्या आता पाकिस्तानात दम भरायला सुरू कर.’
पुण्यात झालेल्या एका पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संजय राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी राऊतांची प्रकट मुलाखत ही घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले होते.
दररोज ट्वीटरच्या माध्यमातून आपले तीक्ष्ण बाण निलेश राणे हे संजय राऊत आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सोडत आहेत.यावर शिवसेनेकडून काहीही उत्तर आलेले नाही.