तर सरकारला कायदे करण्यास भाग पाडू:अण्णा हजारे

राळेगण सिद्धी: राष्ट्रीय स्तरावर जर संघटन असेल तर तसे कायदे करण्यास आपण सरकारला भाग पाडू, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धीत राष्ट्रीय आंदोलन समितीच्या संयोजिका कल्पना इनामदारद्वारे आयोजित राष्ट्रीय आंदोलन परिषदेचे उद्‌घाटन हजारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अण्णा हजारे म्हणाले, कार्यकर्त्यांचे संघटन असेल तर सर्व शक्‍य आहे. संघटनेच्या माध्यमातून आज अनेक कायदे झालेले आपण पहात आहोत. हे कायदे संघटनच करू शकते. पक्ष आणि पार्ट्यांना या देशाचे भवितव्य नाही. पक्ष पार्टी तंत्रामुळे आज देश धोक्‍यात आहे. सामान्य जनतेसाठी त्यांचे योगदान काय? पक्ष पार्ट्या स्वार्थासाठी असतात.
आज आपण राज्यातील स्थितीवरून पहातच आहात.
यामुळे निवडणूक चिन्ह हटविण्यासाठी यापुढे अधिक जोमाने काम करावे लागेल. यासाठी लवकरच राज्यांचा दौरा करणार असून संघटन वाढवून प्रचार प्रसार करणार असल्याचे यावेळी अण्णा हजारे म्हणाले.
संघटनेमध्ये महिला संघटनाही तितकेच महत्वाचे असल्याचे मत इनामदार यांनी व्यक्त केले. संघटन उभारणीत अण्णांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा