गोल पोस्ट राष्ट्रीय तर सरकारमधून बाहेर पडू: अशोक चव्हाण

तर सरकारमधून बाहेर पडू: अशोक चव्हाण

नांदेड: ‘शिवसेनेने उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू’, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे.
नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
चव्हाण म्हणाले की, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडीला विरोध केला होता, मात्र आम्ही त्यांना यासाठी राजी केले. त्याचप्रमाणे घटनाबाह्य काम करणार नाही, असे आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतले.
सध्या मल्टीस्टारचा जमाना असल्याने ३ हिरो पाहिजेतच, घटनेच्या आधारावर सरकार चालले पाहिजे हि आमची भूमिका आहे. असे न झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याच्या सूचना सोनिया गांधी यांनी दिल्या आहेत.
याची संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या बाहेर जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे, त्यामुळे आमचे सरकार व्यवस्थित सुरू आहे.दरम्यान, चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे आता नवीन राजकीय वादंग उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version