वैज्ञानिक अनेक वर्षांपासून वृध्द अवस्था का येते याचे संशोधन करत आहेत. त्याच बरोबर या सोबत येणाऱ्या समस्यांचा ही शोध घेत आहेत. वय वाढविण्याची ही प्रक्रिया प्रत्येक मनुष्याला सतत वृद्धावस्थेकडे नेत असते. वेगवेगळे वैज्ञानिक आपले वेगवेगळे विचार मांडत आहेत. यातील एक वैज्ञानिक स्टीव्ह होरवथ यांनी याचे सखोल संशोधन केले आहे.
अमेरिका मधील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मध्ये
स्टीव्ह होरवथ एक यूसीएलएचे प्रोफेसर आहेत. ते म्हणतात की, “मला हा प्रश्न नेहमी आपल्याकडे आकर्षित करत राहतो की आपण वृद्ध का होतो. तसेच हे टाळण्यासाठी आपण यावर काही औषध उपचार करू शकतो का याची जिज्ञासा नेहमीच मला असायची.”
स्टीव्ह होरवथ यांनी होर्वाथ एजिंग क्लॉक विकसित केले आहे. जे वयस्क होण्याचे अत्यंत अचूक मॉलिक्युलर बायोमार्कर अँड डेव्हलपिंग वेटेड कोरिलेशन नेटवर्क विश्लेषण विकसित करण्यासाठी ओळखले जाते. त्यांना अनेक संशोधन पुरस्कार मिळाले आहेत. वृद्धत्व प्रक्रिया आणि वय संबंधित अनेक रोग / परिस्थिती यांचा अभ्यास त्यांनी केला आहे. होरवथ यांनी वृद्धावस्थेचा एक एपिजनेटिक क्लॉक सिद्धांत प्रस्तावित केला जो जैविक वृद्धत्व हे विकासात्मक कार्यक्रम आणि देखभाल कार्यक्रम या दोन्हीचा अनोखा परिणाम समोर आणतो.
स्टीव्ह होरवथ यांनी याआधीही या विषयावर भरपूर विचार केला होता. यामध्ये सर्वात मोठी समस्या अशी होती की म्हातारपण कसे मोजले जावे, म्हातारपण ही न मोजता येण्यासारखी गोष्ट आहे. म्हातारपण का येते त्याची वैज्ञानिक कारणे काय आहेत असे अनेक प्रश्न त्यांना पडले होते. अनेक लोक सल्ले देतात की अमुक-अमुक गोळी खाल्ली म्हातारपण उशिरा येते परंतु याचे कोणतेही वैज्ञानिक दुवे आज पर्यंत मिळाले नाही.
दीर्घकाळापर्यंत वैज्ञानिकांना असे वाटत होते की क्रोमोझोन च्या शेवटच्या भागातील डी एन ए च्या विश्लेषणातून या गोष्टीतील रहस्य समजू शकेल परंतु तसे झाले नाही. ह्याआधी केल्या गेलेल्या संशोधनामध्ये फारशी अचूकता नव्हती त्यामध्ये दहा ते पंधरा वर्षांचा फरक असायचा त्यामुळे ते फारसे विश्वसनीय नव्हते.
ह्या सर्व गोष्टी होत असताना एके दिवशी स्टीव्ह होरवथ यांच्या हाती एक सुगावा लागला. झाले असे की ते दुसऱ्या संशोधनाच्या अंतर्गत डी एन ए मध्ये समलैंगिकता साठी कारणीभुत भाग शोधत होते. त्यांचे पूर्ण लक्ष ए पी जेनेटिक वर होते. हे असे भाग असतात की जे डीएनएमध्ये काही ठिकाणी जाऊन एकमेकांना जोडले जातात आणि पुन्हा वेगळ्या होतात. स्टीव्ह होरवथ यांना ही संख्या निश्चित करायची होती की हे भाग डीएनए मध्ये किती ठिकाणी जोडले जाण्याची आणि वेगळे होण्याची संभावना आहे. यासाठी त्यांना हजारो कोशीकांवर लक्ष ठेवायचे होते. डाटा तयार केल्यानंतर ते समलैंगिकतेचा अभ्यास करत असताना च बुद्धतत्वाचे कारण त्यांच्या लक्षात आले. यावर ते म्हणाले की, “मी तर पूर्ण चक्रावलो होतो, कारण हा एक मोठा संकेत होता, मला तर यावर विश्वासच बसत नव्हता वृद्धत्व तेचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव या एपी डीएनए वर पडत असेल.” त्यांच्या निदर्शनास आले की देणे वर असलेले एपी मार्क्स वयानुसार बदलत होते. मिळालेल्या घाटाचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना समजले की असे का होते. येथे एपी मार्क अशारीतीने बघत होते की ज्याप्रमाणे एखाद्या रेतीच्या घड्याळाला बघितले जाते. स्टीव्ह होरवथ यांनी अशी ३५३ घड्याळ शोधून काढली. याचा विश्लेषण केल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या वयाच्या ३.६७ भागाचा अभ्यास केला जाऊ शकत होता. स्टीव्ह होरवथ त्यांच्या संशोधनाच्या जवळपास आले होते परंतु कोणत्याही वैज्ञानिक पत्रिकेने त्यांच्या या संशोधनाची दखल घेतली नाही. त्यांच्या या घड्याच्या थेअरि वरती कोणाचाच विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले की, ” मी वय मोजण्याची पद्धत शोधून काढली आहे याच्या साह्याने प्रत्येक कोषिकेचे वय शोधणे शक्य होणार आहे. परंतु वैज्ञानिकांना असे वाटत होते की मी युनिकॉन विषयी बोलत आहे ते म्हणायचे कि युनिकॉन वगैरे काही नसते व माझ्या संशोधनाकडे दुर्लक्ष करायचे.” परंतु स्टीव्ह होरवथ यांनी हिंमत हारली नाही आणि अखेर ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांचे हे संशोधन प्रकाशित करण्यात आले. वैज्ञानिकांना त्यांच्या या संशोधनावर विश्वास बसत नव्हता. ते केवळ एक या संशोधनातील सुरुवात मानली जाते. हे पद्धती वेगवेगळ्या सजीवांवर ती वापरून त्यातील परिणाम अभ्यासले जात आहे.