गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा …तरच सिनेमा साईन करते : दीपिका

…तरच सिनेमा साईन करते : दीपिका

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण कोणताही सिनेमा साईन करताना काय करते? याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.
दीपिका म्हणाली की, मी आजही सिनेमा निवडताना माझ्या मनाचे ऐकते. मी तेच सिनेमे करते जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचे असतात. सिनेमाची कथा ऐकून मी जर एक्सायडेट झाली तरच सिनेमा साईन करते. दीपिका लवकरच मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती ’83’ या चित्रपटातही रणवीर सिंगसोबत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version