तरुणींच्या गळ्यातील ताईत अष्टपैलू अभिनेता ‘जॉन अब्राहम’

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक म्हणून जॉन अब्राहमकडे आज पाहिले जात आहे. आज त्याचा ४७ वा वाढदिवस. त्याने आजपर्यंत केलेल्या अभियानाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

जॉन अब्राहम हा आपल्या चांगल्या बॉडीमुळे तरुणांमधे खूप लोकप्रिय आहे. जॉन हा अभिनेता व निर्माता म्हणून काम करतो.
जॉनचा जन्म केरळमध्ये झालेला आहे. त्याचे वडील मलायली व आई गुजराती आहेत. जॉनचे पारसी नाव फरहान आहे. मात्र वडिलांनी त्याचे नाव जॉन ठेवले आहे.
जॉन २२ वर्षांचा असताना त्याने हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनचा ‘रॉकी ४’ पाहिला. आणि त्यानंतर इंस्पायर होऊन त्याने स्वतःला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला. आजवर अनेक देशभक्तीपर चित्रपट बॉलिवुडमध्ये बनवण्यात आले. मात्र याच पार्श्वभूमीवर नागरिकांध्ये एकात्मकतेची आणि बंधुतेची भावना ठेवत जॉननेही देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.

जॉनचे देशभक्तीपर चित्रपट

बाटला हाऊस: २००८ ला दिल्लीतील जामिया नगरातील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांचे विशेष दल व इंडियन मुजाहिदीनचे ४अतिरेकी यांच्यात चकमक झाली होती. या सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

फोर्स २ : ‘रॉ’ एजंटला एखाद्या देशात पकडल्यानंतर किंवा त्याचे दुसऱ्या देशात काही कारणाने निधन झाल्यानंतर देश त्याची जबाबदारी नाकारतो. याविषयी हा चित्रपट आहे.

परमाणु : भारतीय अणुचाचणीवर आधारित परमाणु हा चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धमाल कमाई केली आहे.

सत्यमेव जयते : भ्रष्टाचाराविरुध्द लढणाऱ्या एका युवकाची कथा या चित्रपटात आहे. यामध्ये जॉन एका पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत आहे. पोलिस विभागातून होत असलेला भ्रष्टाचारा विरोधात तो लढतो.

‘रॉ’: जॉन अब्राहमच्या ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ (रॉ) हा चित्रपट १९७१ च्या युद्धातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये भारत – पाकिस्तान युद्धातील एका गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा