सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी “टास्क फोर्स”

सोलापूर दि.२५ मे २०२०: सोलापूर शहरात १२ एप्रिल रोजी कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळला होता. अवघ्या दीड ते पावणे दोन महिन्यात सोलापुरातील कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५६५ झाली आहे तर ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.

सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन सदस्यीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सोलापूर शहरातील २ खासगी तज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. डॉ. फिरोज सय्यद व डॉ. अमोलकुमार अचलेकर या खासगी डॉक्टरांची सेवा व मार्गदर्शन घेतले जाणार आहे. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्ष विभागाच्या प्रमुखांनी ही दोन नावे सुचविली आहेत. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

पुढील आदेश येईपर्यंत या दोन्ही डॉक्टरांच्या सेवा जिल्हा रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिगृहीत करण्यात आल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा