मिस्त्री परिवाराच्या प्रस्तावाला टाटा समूहाने म्हटले ‘मूर्खपणाचा प्रस्ताव’

नवी दिल्ली, ११ डिसेंबर २०२०: टाटा समूह आणि सायरस मिस्त्री यांच्यात गेल्या जवळपास ४ वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. गुरुवारी या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयात टाटा सन्सपासून वेगळे होण्याच्या शापूरजी पालनजी (एसपी) गटाचा प्रस्ताव टाटा समूहाने फेटाळला आहे.

वास्तविक, मिस्त्री परिवाराद्वारे नियंत्रित असलेल्या शापूरजी पालनजी (एसपी) गटाने सर्वोच्च न्यायालयात दावा केला आहे की, टाटा सन्समधील त्यांच्या १८.४ टक्के भागभांडवलाचे मूल्य जे १.७५ आहे यास टाटा समूहाने नकारले आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान टाटा समूहाचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी याला ‘मूर्खपणाचा’ प्रस्ताव घोषित केला आहे. ते म्हणाले की, अशाप्रकारे दिलासा देता येत नाही, टाटा समूह त्याला विरोध करतो.

ज्येष्ठ वकील हरीश साळवे म्हणाले की, टाटा सन्समधील शापूरजी पाल्लनजी समूहाच्या १८.४ टक्के समभागांचे मूल्य ८०,००० कोटींपेक्षा जास्त नाही. साळवे या प्रकरणात टाटा समूहाच्या वतीने बाजू मांडत आहेत. तत्पूर्वी, टाटा सन्समधील शापूरजी पालनजींच्या भागीदारीच्या मूल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ८ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. (फोटो: फाइल)

वास्तविक, नुकतीच, शापूरजी पालनजी ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, टाटा सन्समधील आपला हिस्सा विकून ते बाहेर पडायला तयार आहेत. यासाठी मिस्त्री कुटुंबाचा दावा आहे की, टाटा सन्समधील त्यांचा १८.४ टक्के हिस्सा १.७५ लाख कोटी रुपये आहे.

मिस्त्री कुटुंबाच्या मालकीच्या शापूरजी पालनजी (एसपी) गटाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, सर्व सूचीबद्ध शेअर्स, असूचीबद्ध शेअर्स, ब्रँड, रोख आणि अचल संपत्तीच्या आधारे भागभांडवलाचे मूल्यांकन केले गेले आहे. टाटा सन्समधील शापूरजी पालनजी ग्रुपच्या १८.४ टक्के भागभांडवल त्यानुसार याचे मूल्य १,७५,००० कोटी रुपये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा