टाटा नेक्सन देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार…

9

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२०: देशातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग (सेगमेंट/वाहन विभाग) सुरुवातीच्या काळातून जात आहे. या सुरुवातीच्या काळात वाहन चार्ज करणे ही एक मोठी समस्या कायम आहे. तथापि, परिस्थिती सामान्य होण्यास वेळ लागेल. परंतु, आता लोक हळूहळू वाहनातील हा इलेक्ट्रॉनिक विभाग (सेगमेंट) स्वीकारत आहेत. नुकतीच वाहन निर्मिती कंपन्यांनी ऑगस्टच्या विक्रीचे आकडे जाहीर केले. ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनाची विक्रीही पाहायला मिळाली. इथली खास गोष्ट म्हणजे लोकांनी इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी टाटा मोटर्सवर विश्वास व्यक्त केला.

नेक्सन देशातील सर्वाधिक विक्री करणारी कार बनली:

वास्तविक टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या सर्वात सुरक्षित एसयूव्ही नेक्सनचे इलेक्ट्रिक वर्जन लॉन्च केले. ज्याने ऑगस्ट महिन्यात २९६ कारची विक्री केली आहे. जुलै २०२० मध्ये या कारने २८६ मोटारी विकल्या. इथली खास गोष्ट म्हणजे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे होणारी आर्थिक मंदी असूनही, लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे पसंती दाखवत आहेत.

सिंगल चार्ज मध्ये चालते ३०० किलोमीटर

नेक्सन ईव्हीमध्ये ३०.२ kWh ची लिथियम-आयन बॅटरी वापरली गेली आहे, जी पुढच्या चाकावर १२९ पीएसची शक्ती आणि २४५ एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा असा दावा आहे की या कारचा ताशी वेग ताशी १२० किमी आहे. त्याचबरोबर ताशी ० ते १०० किमी वेगा पर्यंत पोहोचण्यास फक्त ९ सेकंद लागतात. ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलल्यास, नेक्सन एका चार्ज मध्ये २५० किमी ते ३०० किमीचे अंतर कापण्यासाठी सक्षम आहे. नेक्सन ईव्हीला चार्ज होण्यासाठी ७ ते ८ तास लागतात, जर वेगवान चार्जर वापरला गेला तर ही कार ६० मिनिटांत ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

किंमत किती आहे:

या इलेक्ट्रिक कारची किंमत भारतात १३.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ते १५.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत निश्चित केली गेली आहे. ह्युंदाई कोना आणि एमजी झेडएस ईव्ही देखील बाजारात इलेक्ट्रिक विभागात उपलब्ध आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे