टाटा समूहाच्या उच्च अधिकार्‍यांमध्ये होणार वेतन कपात

नवी दिल्ली, दि. २५ मे २०२०: खर्च कमी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून टाटा समूहाने आपल्या इतिहासात प्रथमच टाटा सन्सचे अध्यक्ष व सहयोगी कंपन्यांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन कमी केले आहे. टाटा समूह या कर्मचाऱ्यांच्या कम्पन्सेशन मध्ये सुमारे २०% कपात करेल. यामध्ये कम्पन्सेशन, सेल्स कमीशन आणि बोनस इत्यादींचा समावेश आहे.

या समूहाची प्रमुख कंपनी आणि सर्वाधिक नफा असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सर्वप्रथम सीईओ राजेश गोपीनाथन यांच्या वेतनात कपातची घोषणा केली. इंडियन हॉटेल्सने आधीच सांगितले आहे की संकटाच्या या काळात कंपनीचे वरिष्ठ नेतृत्व या तिमाहीत आपल्या पगाराच्या काही टक्के वाटा देईल.

टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर, ट्रेंट, टाटा इंटरनेशनल, टाटा कॅपिटल आणि व्होल्टाजचे सीईओ आणि एमडीसुद्धा कमी पगार घेतील. कंपनीच्या या निर्णयाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात बोनसमध्ये कपात केली जाईल.

टाटा समूहाचे एक वरिष्ठ सीईओ, नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले की, टाटा समूहाच्या इतिहासात अशी वेळ कधी आली नव्हती आणि या वेळी व्यवसाय वाचविण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. ते म्हणाले, “योग्य नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सहानुभूतीने सर्व पावले उचलू. टाटा समूहाची संस्कृती शक्य तितक्या कर्मचार्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा