नवी दिल्ली, ९ ऑक्टोंबर २०२२ : टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV चे बुकिंग १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. कंपनीने या कारबाबत अनेक दावे केले आहेत. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्स या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. Tiago EV ही टाटा मोर्टर्सची तिसरी इलेक्ट्रिक कार आहे.
कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे. कंपनीने Tiago EV सह इलेक्ट्रिक हॅचबॅक सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत या कारमुळे ६.५ रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. यासाठी कंपनीने तुलनात्मक डेटाही सादर केला
टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही याच श्रेणीची पेट्रोल कार चालवली तर हजार किलोमीटर चालवण्यासाठी तुम्हाला ७५०० रुपयांचे इंधन लागले. त्याच वेळी, Tiago EV १००० किमी चालवण्याची केवळ १,१०० रुपये खर्च येईल. त्यामुळे Tiago EV तुम्ही ६,५०० रुपये वाचवू शकता.
Tiago EV चे बुकिंग १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिप किंवा वेबसाइटवर २१,००० रुपयांची टोकन रक्कम जमा करून Tiago EV कार बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी जानेवारी २०२३ पासून सुरू होईल. Tiago EV डिसेंबरपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असणार आहे. Tiago EV ही कार Ziptron टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. Tata Tiago EV ची किंमत ८.४९ लाख ते ११.७९ लाख रुपयांपर्यंत असणार आहे
बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षमयाचबरोबर, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि इनसाइट्सच्या आधारे, २४kWh बॅटरी पॅक व्हेरिएंटला उत्पादन आघाडीवर प्राधान्य देण्यात आले आहे. दोन्ही बॅटरी पॅक जलद चार्जिंग करण्यास सक्षम आहेत. ते DC फास्ट चार्जर वापरून सुमारे ५७ मिनिटांत ८० टक्के पर्यंत चार्ज केले जाऊ शकतात. यामध्ये हिल स्टार्ट आणि डिसेंट असिस्ट, टीपीएमएस, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-मोड रीजन फीचरसह देखील दिले जात आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे