पत्नीच्या वादाला कंटाळून (TCS मॅनेजरने) संपवले जीवन; व्हिडिओमध्ये सांगितल कारण.

11
TCS Manager Suicide TCS Manger Suicide wife's torture Agra
पत्नीच्या वादाला कंटाळून ( TCS मॅनेजरने) संपवले जीवन; व्हिडिओमध्ये सांगितल कारण आहे.

TCS Manager Manav Sharma Suicide : आपल्या पत्नीच्या रोजच्या वादाला कंटाकळून TCS मॅनेजरने राहत्या घरी २४ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेश मधील आग्रा येथे घडली आहे. मानव शर्मा असे आत्महत्या केलेल्या कर्मचऱ्यांच नाव असून ते TCS मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांनी पत्नीच्या वादाला कंटाळून आपले जीवन संपवले असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखील केला आहे. त्यामध्ये त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

मानव शर्मा व्हिडिओत म्हणाले ?

त्यांनी केलेली व्हिडिओ ६ मिनिटे ५६ सेकंदाची असून त्यामध्ये मानव शर्मा गळ्यात फास लावून बोलताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, “पुरूषांचे कायद्याने सुद्धा रक्षण केले पाहिजे. पुरुष खूप एकटे असतात नाहीतर अशी वेळ येईल की कोणीही पुरुष शिल्लक राहणार नाही, त्यांना आपल्या पत्नीचे बाहेर संबंध माहित असूनही त्यांनी शांत राहण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे.” त्याचबरोबर मी याआधी सुद्धा आत्महत्येचा अनेक वेळा प्रयत्न केले असल्याचे सांगितले आहे.

मानव हे मूळचे उत्तरप्रदेश मधील आग्रा येथील रहिवाशी असून नोकरीच्या निमित्ताने मुंबईमध्ये स्थलांतरित झाले होते. ३० जानेवारी २०२४ रोजी त्यांचा विवाह बरहानशी झाला होता असे मानव शर्माच्या वडिलांनी सांगितले. लग्नानंतर ते आणि त्यांची पत्नी मुंबईला राहत होते. पण काही दिवसांनी मुंबईमध्ये पती – पत्नीचे वारंवार वाद होऊ लागल्याने पत्नी बरहान मानवला आणि घरच्यांच्या कायद्याच्या चौकटीत अडकवण्याची धमकी देत होती. त्याचबरोबर वारंवार आपल्या बॉयफ्रेंड सोबत राहण्याची भाषा करू लागली होती.

मानव शर्मा यांचे वडील वायुदलातून निवृत्त झाले असून त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समजताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. पत्नीच्या जाचाला वैतागून माझ्या मुलाने आत्महत्या केली; असे त्याचे वडील नरेंद्र शर्मा म्हणाले.असून मला न्याय हवा आहे, अशी मागणी त्यांनी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा