‘ते’ सतरा आमदार अपात्रच!

नवी दिल्ली : कर्नाटकमधील काँग्रेस- जनता दल सेक्युलर या पक्षांच्या १७ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ते १७ आमदार अपात्र ठरले आहेत. मात्र या आमदारांना निवडणूक लढविण्यास मात्र सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला आहे. असे सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस-जेडीएसच्या १७ आमदारांनी कुमारस्वामी सरकारविरोधात बंड पुकारत कर्नाटकात भाजप सरकार येण्यास मदत केली होती.
विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी व्हीप नाकारणार्‍या या आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या १७ रिक्त जागांपैकी १५ मतदार संघांत पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे त्या १७ आमदारांना पुढील पोटनिवडणूक लढवता येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा