“ते” विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात : राहुल गांधी

दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी (दि.५) रोजी रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खेद व्यक्त केला आहे. आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात असंच आजच्या जेएनयू वरील हल्ल्यावरुन दिसत आहे असे राहुल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मुखवटा घातलेल्या गुंडांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर पाशवी हल्ला केल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात. आजची जेएनयूमधील हिंसा ही त्या भीतीचे प्रतिबिंब आहे असा दावा राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री लाठी घेऊन सशस्त्र मुखवटा असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला आणि कॅम्पसमधील मालमत्तेचे नुकसान केले. या हल्ल्यात किमान १८ जण जखमी झाले आणि त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा