सोलापूर, २ जुलै २०२० : सध्या कोरोना वायरसने सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. भारतात देखील कोरोना बाधितांनी ४ लाखाचा टप्पा ओलांडला आहे. यावेळेस कोविड १९ च्या ड्यूटीवर असलेल्या शासन , प्रशासन , पोलिस , डॉक्टर नर्सेस यांच्या बरोबरच शिक्षकांना देखील कोरोना विरूद्धच्या लढ्यात सरकारने कामे दिली आहेत. परंतू या कामामध्ये शिक्षकांना अनेक अडचणी व समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत.
याच अडचणी व समस्यांविषयी काल सोलापूर महानगरपालिकेच्या कोविड १९ च्या ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांनी आपली समस्या फोनद्वारे शिक्षक प्रतिनिधि व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार सरांना सांगितली आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली.
शिक्षकांच्या विनंती नंतर अवघ्या १० मिनिटात सरांनी महापालिकेत धाव घेतली आणि शिक्षकांच्या सर्व समस्या पूर्ण ऐकून घेवून उपायुक्त श्री पंकज जावळे यांच्याशी चार शिक्षक प्रतिनिधींसह प्रत्यक्ष भेट घेऊन दिर्घकाळापासून कोविड १९ च्या ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांची मुक्तता करावी असे निवेदनही दिले.
उपायुक्त साहेबांनी ते निवेदन स्वीकारून कोविड १९ च्या ड्यूटीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांची येत्या २ दिवसात ड्यूटी रद्द करू असे आश्वासन दिले. कोविड-१९ च्या ड्यूटीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या एका हाकेला धावून आलेल्या श्री जितेंद्र पवार यांचे शिक्षकांनी आभार मानले
न्यूज अनकट प्रतिनिधी