ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी- २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

35

नवी दिल्ली, २ डिसेंबर २०२२ :महिला टी- २० विश्वचषक स्पर्धेतील चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ टीम इंडियाविरुद्ध पाच सामन्यांची टी- २० मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. येत्या ११ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.

महिला टीमचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हीच्याकडे देण्यात आले आहे. तर आपली मराठमोळी खेळाडू स्मृती मानधनाकडे उपकरणदार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात महिला टीम कशी कामगिरी करणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पूजा वस्त्राकार ही जखमी झाल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या आगामी टी – २० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची असणार आहे. पूजा वस्त्राच्या जागेवर कोणाला संधी देणार याबाबत अद्याप निवड समितीने काहीही जाहीर केलेले नाही. एकीकडे दुखापतीमुळे पूजा वस्त्राकार ही मालिका खेळणार नाही. त्याचबरोबर ऑलराऊंडर स्नेह राणालाही संघातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, महिला भारतीय संघाचे सामने हे फक्त दोनच मैदानात होणार आहेत. पहिले दोन सामने डी.वाय पाटील मैदान तर उरलेले तीन सामने ब्रेबाॅर्न मैदानात खेळले जाणार आहेत‌.

भारतीय संघ :
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह ठाकूर, मेघना सिंह, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), हरलीन देओल.

नेट बॉलर :
तर मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एस बी पोखरकर, सिमरन बहादुर.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे