नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२३ :टीम इंडियाने रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि १३२ धावांनी पराभव केला. यासह भारताने १- ० अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर-१ टीम बनली आहे.
आज जाहीर झालेल्या कसोटी संघाची क्रमवारी अपडेट होताच टीम इंडियाने यातही नंबर १ स्थान पटकावले असून, क्रिकेट विश्वात इतिहास रचला आहे. रोहित शर्मा हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१ ठरला आहे. सध्या टी-२० संघाचा कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे तर वनडे आणि कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे आहे.
वनडे आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ आधीच अव्वल आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ १११ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंड १०६ गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड १०० गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका ८५ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
- रविचंद्रन अश्विन दुसर्या स्थानी
अश्विनने कसोटी गोलंदाजी गाठले दुसरे स्थान नागपूर कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या अप्रतिम फिरकी जोडीने सामना गाजवला होता. ऑस्ट्रोेलियाच्या या कसोटी सामन्यात दोघांनी मिळून एकूण १५ विकेट घेतल्या. त्यानंतर आता अश्विनने ८४६ रेटिंग गुणांसह ICC च्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरून दुसरे स्थान पटकावले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.