टीम इंडियाची आघाडी; 6 बाद 493 धावा

इंदोरमध्ये भारत आणि बांग्लादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारत 6 बाद 493 धावा अशा मजबूत स्थितीत आहे. भारताने आज दिवसअखेर बांग्लादेशविरुद्ध 343 धावांची आघाडी मिळवली.

काल बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांवर आटोपल्यावर भारताने 1 बाद 86 धावा केल्या होत्या. मात्र आज मयंक अग्रवाल याच्या दुहेरी शतकानंतर भारत 6 बाद 493 धावा अशा मजबूत स्थितीत आहे.

सामन्यातील घडामोडी :

मयंक अग्रवाल 243 धावांवर बाद
चेतेश्वर पुजारा 54 धावांवर बाद
 विराट कोहली 0 धावांवर बाद
 अजिंक्य रहाणे 86 धावांवर बाद
 वृद्धिमान साहा 12 धावांवर बाद

मयंकचा विक्रम : या सामन्यात मयंकने 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. तो कसोटीत सर्वात जलद पहिली दोन द्विशतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी कारकिर्दीतील 13 व्या डावात दुसरे द्विशतक केले होते. तर मयंकने तेच 12 व्या डावात करून दाखवले. मयंकने त्यांचा विक्रम मोडला आहे.

कसोटीत सर्वात जलद पहिली दोन द्विशतके करणारे फलंदाज :

 5 डाव – विनोद कांबळी
 12 डाव – मयंक अगरवाल
 13 डाव – डॉन ब्रॅडमन
 14 डाव – लॉरेन्स रोव
 15 डाव – ग्रॅमी स्मिथ

दरम्यान, आजच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ अंधुक प्रकाशामुळे थांबवण्यात आला तेव्हा रवींद्र जडेजा 60 धावांवर तर उमेश यादव 25 धावांवर खेळत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा