टीम इंडियाच्या ‘सुपरफॅन दादी’ यांचे निधन

आयसीसी विश्वचषक २०१९ दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर आलेल्या आणि ‘सुपरफॅन दादी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ८७ वर्षीय क्रिकेट चाहत्या चारूलता पटेल यांचे निधन झाले आहे.

चारुलता यांच्या निधनामुळे बीसीसीआय ने ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये बीसीसीआय कडून असे सांगण्यात आले आहे की, “चारुलता पटेल या नेहमीच आपल्या आठवणीत राहतील. क्रिकेट विषयी त्यांची असलेली आवड ही आपल्याला नेहमीच प्रेरित करत राहील. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”

इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेदरम्यान जेव्हा त्यांनी स्टेडियमवर जाऊन टीम इंडियाचे समर्थन केले तेव्हा चारुलता पटेल टीम इंडियाची खास चाहती बनली. या दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्टँडवर जाऊन त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनीही त्यांचे आशीर्वाद घेतले. ज्याप्रकारे त्या टीम इंडियाला प्रोत्साहन देत होत्या, त्यांनी सर्वांना आनंदित केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा