सांगली जिल्ह्यात आयकर विभागाची पथके दाखल, नागरिकांच्यात चर्चेला उधाण

सांगली, दिनांक ७ सप्टेंबर २०२२: राज्यभर सुरू असलेल्या वेगवेगळ्या कारवायामध्ये सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर नंतर आज सांगली जिल्ह्यातील मायणी येथे आयकर विभागाची पथके दाखल झाल्यामुळे कारवाईचे सत्र सुरूच आहे. आज सकाळीच सांगली जिल्ह्यातील मायणी येथे आयकर विभागाची वेगवेगळी पथके दाखल झाली आहेत. त्यामुळे नागरिकांच्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.

कोल्हापूर नंतर आता सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आयकर विभागाची पथके दाखल झाल्या मूळे खळबळ उडाली आहे. दरम्यान कारवाई अंतर्गत ही पथके विटा, खानापूर तालुक्यासह आटपाडी, खटाव, तासगाव, कडेगाव तालुक्यातही जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आयकर विभागाने सुरू केलेल्या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्यात विटा येथे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या वाहनातून तब्बल दहा पथके दाखल झाली आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील खानापूरसह आटपाडी, तासगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यातील मोठ मोठ्या राजकारणी मंडळींन बरोबर सराफ व्यावसायिक, बांधकाम आणि नामवंत कापड व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

त्यातच कडेगाव हे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांचे असल्याने त्यांच्याकडे कारवाई होणार का अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे तर तासगाव हे दिवंगत नेते माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील असल्याने येथेही चर्चेने जोर धरला आहे. याकारवाई मध्ये कोणाचा नंबर लागणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

सांगली जिल्ह्यात विटा – मायणी रस्त्यावर एका मोठ्या हॉटेलवर आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वेगवेगळ्या गाड्यांच्या ताफ्यासह दाखल झाले असल्याची माहिती समोर येते. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कारवाई केल्यावर आता आयकर विभागाचे अधिकारी परत आल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांनी जोर धरला आहे. या कारवाईत आता कोणाचा नंबर लागणार याची चर्चा सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा