बीड जिल्ह्यात तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई: ६ ट्रॅक्टर सापळा रचून पकडले

12

बीड, दि.६ मे २०२० : बीड जिल्ह्यात तहसिलदार डॉ.विपीन पाटील यांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करत वाळूचे ६ ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. याबाबत परळी जवळील सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईने जिल्ह्यातील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील तेलसमुख येथील गंगेच्या पात्रातून वाळू चोरी होत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळली होती. त्यानंतर तहसीलदार डॉ.विपीन पाटील यांनी वाळू चोरी पकडण्यासाठी सापळा रचला. दि.५ मे रोजी रात्री उशिरा त्यांनी बोरखेड कॅनाॅलवर मुक्काम ठोकला. त्यानंतर रात्री २ वाजल्यापासून वाळुचे ट्रॅक्टर येण्यास सुरुवात झाली. एक एक करत तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सकाळपर्यंत तब्बल सहा ट्रॅक्टर पकडले.

या ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांची वाळू असून सर्व जप्त करून सिरसाळा पोलीस ठाण्यात आणले आहे. पोलीसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्यासोबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी युवराज सोळंके, कोतवाल खाजा आदी उपस्थित होते. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा