तेलंगणच्या तिजोरीत खडखडात; कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन्स स्थगित.

हैदराबाद,१८ जून २०२० :  करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक चणचणीचा सामना करणाऱ्या तेलंगणा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगण सरकारने यासंदर्भात अध्यादेश जारी केला आहे. आपत्कालीन स्थितीत पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचे पगार स्थगित करता येतात आणि पुढे ढकलता येतात. यानुसार तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तेलंगण सरकारने हा अध्यादेश जारी केल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे. हा अध्यादेश आणण्यापूर्वी तेलंगणा सरकारने कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनमध्येही कपातीचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन स्थगित करण्याचा अध्यादेश राज्यपालांनी मंगळवारी जारी केलाय.

२४ मार्च २०२० पासून अध्यादेश प्रभावी

राज्य सरकारचा हा अध्यादेश २४ मार्च २०२० पासून लागू होईल. यानुसार कुठल्याही व्यक्ती, संस्थेची देणी पुढे ढकलण्यात येईल किंवा टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहेत. आपत्ती आणि सार्वजनिक आरोग्य आपत्तीच्या स्थितीत हा निर्णय लागू केला जात असतो यानुसार पुढील सहा महिन्यात सर्वांची देणी दिली जातील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा