टेमघर धरणात वीजनिर्मिती सुरू

पुणे: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी टेमघर हे एक धरण आहे. या धरणाची पाणी क्षमता ३.७१ इतकी आहे. या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. सध्या या धरणातून चार मेगावॉट एवढी वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यातील धारण पानशेत, वरसगाव नंतर टेमघर प्रकल्पातून ही वीजनिर्मितीस प्रारंभ झाला आहे.
यंदा प्रथमच टेमघर धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण भरल्यानंतर धरणातून खडकवासला धरणात पाणी सोडले जाते. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यापासून वीजनिर्मितीचा निर्णय यापूर्वी घेतला गेला होता. त्यासाठी बीओटीवर निविदा मागवण्यात येऊन या प्रकल्पाचे काम दिले होते, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही त्यामुळे मुदतवाढ दिली होती. त्यानंतर गेल्या वर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा