मुंबई, 26 सप्टेंबर 2021: राज्यात कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली आहेत. अनेक प्रकारच्या निर्बंधांमधूनही सूट देण्यात आलीय. पण, ठाकरे सरकारकडून बराच काळ मंदिर उघडण्याची परवानगी दिली जात नव्हती. अशा स्थितीत या मुद्यावरून राज्यात बराच वाद झाला. भाजप सतत सरकार वर निशाणा साधत होते. आता त्या दबावाखाली राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 7 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात मंदिरं उघडली जातील. यासह, लोक 7 ऑक्टोबरपासून शिर्डी मंदिर, मुंबा देवी मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जाऊ शकतील.
राज्यात मंदिरं उघडणार
अशी माहिती देण्यात आलीय की, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडली जातील. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं निवेदन जारी करून हा निर्णय देण्यात आलाय. आता मंदिरांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागंल. सरकारनं स्पष्ट केलंय की प्रत्येक परिस्थितीत कोरोना नियमांचं पालन करणं आवश्यक असेल. मग मास्क असो किंवा सामाजिक अंतर असो. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दुर्लक्षित केला जाणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. आता हळूहळू सर्व काही उघडलं जात आहे. प्रकरणं नक्कीच कमी होत आहेत, परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. मंदिरं नक्कीच उघडली जात आहेत, परंतु कोरोना प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन केलं जाईल.
शाळा उघडण्याची पूर्ण तयारी
तसंच, मंदिरांव्यतिरिक्त, आता राज्य सरकारनं सहावी ते बारावीपर्यंत शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 4 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात शाळा उघडल्या जातील असं सांगण्यात आलंय. शाळा ग्रामीण भागात 5-12 आणि शहरी भागात 8-12 साठी वर्ग उघडल्या जातील. परंतु तेथेही एक कठोर कोरोना मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत, ज्याचं पालन करणं अनिवार्य असंल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे