“या” तीन देशांवर तात्पुरती व्हिसावर बंदी

नवी दिल्ली : भारतातील कोरोना विषाणूचे वाढणारे संक्रपण पाहून भारत सरकारने फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनचा तीन देशांच्या नागरिकांवर भारतातील प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे.अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यामुळे फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधून आतापर्यंत भारतात कधीही न आलेल्या नागरिकांच्या नियमित व्हिसासह ई-व्हिसावरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
इमिग्रेशन ब्युरोने मंगळवारी (दि.१०) रात्री उशिरा याची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यामुळे भारतात प्रवेश न केलेल्या आणि ज्यांना नियमित व्हिसा जारी झालेला आहे अशा फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांचे दोन्ही प्रकारचे व्हिसा तत्काळ निलंबित केल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने देखील यासंदर्भात सूचना जारी केली आहे. भारतीयांना चीन, ईटली, इराण, रिपब्लिक ऑफ कोरिया, जपान, फ्रान्स, स्पेन व जर्मनीचा प्रवास टाळण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.
इटली आणि दक्षिण कोरियाहून आलेल्या प्रवाशांसाठी कोविड-१९ निगेटीव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा