नाशिक येधील चिंचखेड मध्ये दहा ते बारा एकर ऊसाला लागली आग; पूर्ण ऊस जळून खाक

58

नाशिक, २८ ऑक्टोबर २०२२: नाशिक तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनूसार ऊसाच्या शेतावरुन महावितरणची मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पाकिंगमुळे ही आग लागल्याचे समजते आहे.

या आगीत तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल दहा ते बारा एकर ऊस जळून खाक झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्याचे स्थानिक शेतकऱ्याने सांगितले आहे. यामध्ये मोतीराम पाटील, रंगनाथ पाटील, विष्णु मोरे, कैलाश पाटील, सदाशिव पाटील, दौलत पाटील, या शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

शासनाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी कादवा कारखान्याचे माजी चेरमन प्रभाकर पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. तर ऊसाच्या शेत्राशेजारी असलेल्या खंडेराव फुकट यांच्या द्राक्ष बागेचे देखील मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर