आपत्कालीन अधिकारांतर्गत तोफा, क्षेपणास्त्रं, ड्रोन खरेदीसाठी भारतीय लष्कराने जारी केल्या निविदा

नवी दिल्ली, १९ सप्टेंबर २०२२, भविष्यासाठी सज्ज व्हावे आणि भविष्यातील युद्धे स्वदेशी शस्त्रांसह लढावीत, या उद्देशाने भारतीय लष्कराने देशांतर्गत उत्पादकांकडून तोफा, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर अनेक यंत्रणा खरेदी करण्यासाठी अनेक निविदा जारी केल्या आहेत. आणीबाणीच्या खरेदी प्रक्रिया अंतर्गत आवश्यक्य गरजा पूर्ण करण्यासाठी जारी करत आहेत.

“आम्ही भारतीय संरक्षण उद्योगाला आपत्कालीन खरेदीसाठी महत्त्वपूर्ण संरक्षण उपकरणे ऑफर करण्यासाठी आमंत्रित केले आहे. तोफा, क्षेपणास्त्रे, ड्रोन, काउंटर-ड्रोन, लॉयटर युद्धसामग्री, दळणवळण आणि ऑप्टिकल प्रणाली, विशेषज्ञ वाहने, अभियांत्रिकी उपकरणे आणि पर्यायी ऊर्जा संसाधने, यासाठी प्रस्ताव सादर केला जात आहे.” असे भारतीय लष्कराने आज सांगितले. ही प्रक्रिया संकुचित टाईमलाईनवर आधारित असेल, ज्यामध्ये परचेज विंडो सहा महिन्यांसाठी भारतीय उद्योगांसाठी खुली असेल आणि उद्योगाने करारावर स्वाक्षरी केल्यानंतर एक वर्षाच्या आत उपकरणे वितरित करणे अपेक्षित आहे. खरेदी प्रकरणं खुल्या निवेदन चौकशीवर आधारित असतील, असे दलाने सांगितले.

आपत्कालीन खरेदी अधिकारांतर्गत, सशस्त्र दल भांडवली खरेदी प्रकरण अंतर्गत ३०० कोटी रुपयांचे उपकरणे आणि महसूल खरेदी प्रकरणांतर्गत ५०० कोटी रुपयांची उपकरणे खरेदी करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या शेवटच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेत या खरेदीची मंजुरी तीन सेवांना देण्यात आली होती. सैन्याला सहा महिन्यांच्या विंडोसाठी हे अधिकार देण्यात आले आहेत. जिथे ते मेक इन इंडिया मार्गांतर्गत उत्पादित त्यांच्या आवडीची कोणतीही शस्त्रं प्रणाली खरेदी करू शकतात.

यापूर्वी, सेवांना परदेशी विक्रेतांशी थेट व्यवहार करण्याचे स्वातंत्र होते आणि मे २०२० नंतर अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. ज्यामध्ये हेरॉन ड्रोन, स्पाईक ओटी टॅंक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि सैन्याच्या इतर अनेक महत्त्वपूर्ण आवश्यकता पूर्ण केल्या गेल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा