दिवाळीच्या रात्री गुजरातमध्ये तणाव, वडोदरात दगडफेक आणि जाळपोळ

वडोदरा, २५ ऑक्टोबर २०२२: विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमधील वातावरण पुन्हा एकदा बिघडताना दिसत आहे. वडोदरात दिवाळीच्या रात्री तणाव निर्माण झाला होता. शहरातील मुस्लिम मेडिकल सेंटरजवळ दोन समाजातील लोक समोरासमोर आले. या वेळी परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. अनेक वाहने देखील जाळण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील पाणीगेट परिसरात दोन समुदाय समोरासमोर आले. एका समाजाच्या लोकांनी दुसऱ्या समाजाच्या लोकांवर हल्ला केला. दगडफेक आणि जाळपोळ झाली. तसेच पेट्रोल बॉम्ब ही फेकले. घटना घडण्यापूर्वी पथदिवे तोडल्याने परिसरात अंधार झाला होता. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

दरम्यान, यावेळी पोलीस व्हॅनवरही पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. डीसीपी यशपाला जगनिया यांनी सांगितले की, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सीसीटीव्ही तपासण्यात येत असून प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा