साताऱ्यात पेंटिंगवरून तणाव; छत्रपती उदयनराजे व मंत्री शंभूराज देसाई यांच्यात भडका, पोवई नाक्यावर बंदोबस्त

सातारा, ७ मार्च २०२३ : साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानानजीक खासदार उदयनराजे यांची मालकी असलेल्या इमारतीवरील भिंतीवर सोमवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने पेंटिंग काढण्यात येणार होते; मात्र सातारा पोलिसांनी हे पेंटिंग काढण्यास‌‌‌ विरोध करीत संबंधित क्रेन आणि उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी पेंटरकडून पुन्हा पेंटिंग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या पेंटरला पोलिसांनी विरोध करीत काम थांबविण्यास सांगितले. यावेळी पेंटर पाटोळे आणि पोलिसांत शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी पेंटरला ताब्यात घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे. पेंटिंग काढू न दिल्यास इमारतीवरून उडी मारण्याचा इशारा यावेळी पेंटरने दिला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा