यूपीतील सहारनपूरमधून दहशतवादी अटक, नुपूर शर्माला मारण्याची होती योजना, पाकशी संबंध

सहारनपूर, १३ ऑगस्ट २०२२: एटीएसने सहारनपूरमधून जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबानशी संबंधित दहशतवाद्याला अटक करून मोठा कट उधळून लावला. एटीएसने त्याची ओळख मोहम्मद नदीम अशी केलीय. एटीएसच्या चौकशीदरम्यान दहशतवाद्याने सांगितलं की, पाकिस्तानच्या जैशच्या दहशतवाद्यांनी त्याला नुपूर शर्माला मारण्याचं काम दिलं होतं.

दहशतवादी होते फिदाईन हल्ल्याच्या तयारीत

एटीएसने एक प्रेस नोट जारी करून सांगितलं की, एजन्सीला माहिती मिळाली होती की, सहारनपूरमधील गंगोह पोलिस स्टेशनच्या कुंडकलन गावात एक व्यक्ती फिदाईन हल्ल्याच्या तयारीत आहे, जैश आणि तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) यांचा प्रभाव आहे. यानंतर मोहम्मद नदीमची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली.

टीटीपीचा दहशतवादी सैफुल्ला (पाकिस्तान) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद नदीमला फिदाईन हल्ल्याच्या तयारीसाठी प्रशिक्षण साहित्य पुरवलं होतं. याच्या मदतीने सर्व सामान गोळा करून कोणत्याही सरकारी इमारतीवर किंवा पोलिसांच्या जागेवर हल्ला करण्याचा नदीमचा कट होता.

दहशतवादी संघटनांचे चॅट आणि ऑडिओ संदेश सापडले

दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात एक्सप्लोसिव्ह कोर्स फिदाई फोर्स असे एक कागदपत्र सापडले. मोहम्मद नदीमच्या फोनवरून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीटीपी दहशतवाद्यांचे चॅट आणि ऑडिओ संदेश मिळाले आहेत.

व्हर्च्युअल नंबर आणि आयडी तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलं

मुहम्मद नदीमने चौकशीदरम्यान सांगितलं की, तो २०१८ पासून जैश-ए-मुहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या संपर्कात आहे, जसं की व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे.

त्याने या दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल नंबर बनवण्याचे प्रशिक्षण घेतलं. दहशतवादी संघटनांनी त्याला व्हर्च्युअल सोशल मीडिया आयडी बनवून ३० हून अधिक व्हर्च्युअल नंबर दिले होते.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे दहशतवादी नदीमला पाकिस्तानात बोलावत होते. तो लवकरच व्हिसा घेऊन पाकिस्तानला जाणार होता. यानंतर तो इजिप्तमार्गे सीरिया आणि अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होता. भारतातील दहशतवाद्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याची माहिती एटीएसला मिळालीर. सध्या त्याच्या अटकेसाठी एटीएसनेही कारवाई सुरू केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा