काबुलच्या गुरुद्वारावर दहशतवाद्यांचा हल्ला

19

पीटीआय (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुलमधील गुरुद्वारावर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात ११ शीख भक्तांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
एका व्यक्तीने गुरुद्वारा परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांवर अंधाधुंद गोळीबार केला. शोर बाजार परिसरातील गुरुद्वारावर झालेल्या या हल्ल्यावेळी तेथे दीडशेहुन अधिक लोकं उपस्थित होती.
या परिसरामध्ये झालेल्या हल्ल्यात किमान ११ जण ठार झाले आहेत. तर १२जण जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारावर एकूण तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केला. या हल्लेखोरांशी बराच काळ सुरक्षा यंत्रणांचे जवान लढा देत होते.
गुरुद्वारामध्ये अडकेलेल्या अनेक लोकांनी सुरक्षा यंत्रणांनी सुखरुप सुटका केल्याचा दावाही सरकारी प्रवक्त्यांनी केला आहे.
इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे एसआयटीईच्या गुप्तहेर गटाने म्हटलं आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा