जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला असून, त्यात सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले आहेत. याशिवाय ३ सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले आहेत. सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका पार्टीवर हल्ला केला.
याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील नेवा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आणि सीआरपीए आणि पोलिसांच्या संयुक्त छावणीला लक्ष्य केले. शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. त्याच्या पायाला गोळी लागली. या हल्ल्यानंतर जखमी जवानाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते व तेथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या भागांमध्ये शोधाशोध सुरू केली होती परंतु आतंगवादी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले होते.
देशावर एकाबाजूला कोरोणासंकट ओढवले असताना जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या या आतंकवादी हल्ल्यामुळे देशाच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. एकीकडे कोणते संकट असताना दुसरीकडे आतंकवाद्यांची लढत असताना देखील सैनिकांनी कोरोनासाठी लढण्याला आर्थिक मदत केली होती.