श्रीनगर, १३ ऑगस्ट २०२२: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांतील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. शनिवारी संध्याकाळी श्रीनगरच्या अली कादलमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड फेकलं, ज्यामध्ये दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याचवेळी सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे.
याआधी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाट येथील बिजबेहारा आणि बांदीपोरा येथे दहशतवादी हल्ले झाले होते. ज्यात एका स्थलांतरित कामगाराचा मृत्यू झाला, तर एक पोलीस जखमी झाला.
खोऱ्यात टार्गेट किलिंग थांबत नाहीये
खोऱ्यात सातत्याने टार्गेट किलिंग होत आहे. शुक्रवारी पहाटे बांदीपोरा येथील अजस तहसीलच्या सदुनारा गावात दहशतवाद्यांनी एका स्थलांतरित मजुराची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं मृताचं नाव असून तो मोहम्मद जलीलचा मुलगा असून तो बिहारचा रहिवासी आहे. १० महिन्यांत बिहार मधील ७ जणांची हत्या करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे