जम्मू काश्मीर, ७ मे २०२३: जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यास पोलीस आणि सुरक्षा दलांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दहशतवाद्यांच्या साथीदारांला अटक केली आहे. तसेच सुमारे पाच ते सहा किलो ‘आयईडी’ जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इशफाक अहमद वानी असे पुलवामा पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. तो पुलवामाच्या अरीग्राम भागातील रहिवासी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे पाच ते सहा किलो ‘आयईडी’ जप्त केला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात सलग तीन चकमकीनंतर उत्तर काश्मीर मध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर