शोपियान येथे दहशतवाद्यांनी केला हँडग्रेनेडचा स्फोट, दोन मजूर ठार

श्रीनगर, १८ ऑक्टोबर २०२२: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून स्थलांतरित नागरिकांना लक्ष्य केले जात असून शोपियाँ जिल्ह्यात ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी हरमन परिसरात स्थलांतरित नागरिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकत हा हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, मनिष कुमार आणि राम सागर एका शेडमध्ये झोपलेले असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेडमध्ये एकूण पाच कामगार झोपले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात उत्तर प्रदेशातील दोन कामगार जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोघेही कन्नौजचे रहिवासी होते. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.

तर आणखी एका ट्विटमध्ये पोलिसांनी सांगितले की, ग्रेनेड फेकणाऱ्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा इम्रान बशीर घनीचा संकरित दहशतवादी आहे. पुढील तपास आणि छापे सुरू आहेत.

दरम्यान, यापूर्वी १५ ऑक्टोबर रोजी या दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील चौधरी गुंड येथे काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट यांची त्यांच्या घराजवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा