पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर ऑगस्टपासून चाचण्यांना सुरुवात, नव्या कार्गो टर्मिनलचा पुणेकरांना मोठा फायदा

पुणे, ६ जून २०२३ : पुणे विमानतळावरुन प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जुन्या इमारती लगत नवं कार्गो टर्मिनल उभारलं जात आहे. या नव्या कार्गो टर्मिनलचे जवळ जवळ ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. उर्वरित काम जुलै महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पुणे विमानतळावरील नवीन कार्गो टर्मिनलच्या सुविधांच्या चाचण्यांना सुरुवात केली जाणार आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यापर्यंत या नव्या वास्तूचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नव्या कार्गो टर्मिनलचा पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे. तसेच, या कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक दुप्पट होणार आहे.

सध्या पुणे विमानतळावरुन प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर विमानतळावरुन होत आहे. त्यामुळे पुणे विमानतळावरील जुने प्रवासी आणि मालवाहतुकीचे टर्मिनल अपुरे पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने येथे लागूनच प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे काम है घेतले आहे. त्यानुसार सध्या दोन नवी टर्मिनल उभारले जात आहेत. यापैकी कार्गो टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

पुणे एअरपोर्टला स्वतःची जागा नाही. लोहगाव येथील भारतीय वायुदलाच्या हवाई तळाच्या जागेमध्येच पुणे एअरपोर्ट उभे आहे. हवाई तळाचा एक भाग वायुदलाकडून वापरला जातो तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे असलेल्या दुसऱ्या भागात प्रवासी विमानांची ये जा होत असते. गेली अनेक वर्ष पुणे एअरपोर्ट नवीन जागेत सुरु करण्याची चर्चा सुरु आहे. पुरंदर तालुक्यात हे विमानतळ प्रस्तावित आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्याने नवीन एअरपोर्ट उभे राहू शकले नाही. अशातच आहे त्या इमारतीला लागूनच विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन केले आहे.

पुणे विमानतळाला ४७५ कोटी रुपये खर्च करून वाढीव क्षमतेची नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. नवीन टर्मिनलचे सध्याच्या टर्मिनलसह एकत्रिकरण करण्यात येणार आहे. पुणे विमानतळाला वाढीव क्षमतेसह नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा