दासगावं खाडी पट्ट्यात ठाकरे गटाला खिंडार; जुई येथील देवळे बंधू व सहकारी यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

रायगड, २० फेब्रुवारी २०२४ : शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश कर्त्यांची रांग लागली असून दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी मतदारसंघात एकाच दिवशी चार पक्ष प्रवेश घेऊन विरोधकांचे नामोहरण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

माणगाव तालुक्यातील तीन पक्षप्रवेशानंतर आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाला खाडीपट्ट्यात जोरदार धक्का दिला असून दासगावं खाडीपट्ट्यातील जुई गावच्या शेकडो देवलेकर बंधूंनी आणि सहकाऱ्यांनी आमदार भरत गोगावले यांच्या विकास कामांचा झंजावात पाहून पुन्हा शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशा वेळी आमदार भरत गोगावले यांच्या शुभहस्ते जुई गाव ते देवलेवाडी पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलत असताना आमदार भरत गोगावले म्हणाले कि, माझ्या मतदारसंघात एकही गाव वाडी विकासापासून वंचित नाही. जर एखादं काम शिल्लक राहिले असेल, तर ते येत्या अधिवेशनात मार्गी लावणार असल्याचे अभिवचन आमदार भरत गोगावले यांनी दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नितेश लोखंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा