मुंबई, १७ जुलै २०२३ : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच या आमदारांच्या अपात्रतेवर विधिमंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटातून मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गट सोडुन शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. या तिन्ही आमदारांनी पक्ष सोडताना पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. तसेच पक्षातील कारभारावरही टीका केली होती. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही टीका केली होती.
मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांनी पक्ष सोडल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या तिघांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाने त्याबद्दलचे पत्रच विधीमंडळ सचिवांना दिले आहे. त्यामुळे विधीमंडळ सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर