मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब आपले कुलदैवत असलेल्या वेहेरगाव कार्ला येथील आई एकवीरेचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आमदार आदित्य ठाकरे होते.मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री ठाकरे हे आपले कुलदैवत असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आले.

यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी महापौर अनंत तरे, मदन भोई, नवनाथ देशमुख, विलास कुटे, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार मधुसूदन बर्गे व इतर उपस्थित होते.
दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा