धावपळीचे आयुष्य, कामाचा ताण आणि घर! या सगळ्यात शरीराकडे स्त्रियांचे दुर्लक्ष होतेच. यातूनच थायरॉईडची समस्या निर्माण होते. थायरॉईड नेमका कशामुळे होतो आणि त्यावर खबरदारी…
▪लक्षणे : वजन काही दिवसांमध्ये झपट्याने वाढते किंवा कमी होत असेल. कामात मन न लागणे. नाराज वाटत राहणे. थायरॉइडची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते.
दुष्परिणाम : थायरॉइड असा आजार आहे, ज्यामुळे रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होऊ शकतो. हा आजार ३० वर्षांनंतर महिलांमध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. वयाच्या ६० पर्यंत प्रत्येक पाच पैकी एका महिलेला थायरॉइडची समस्या असते. थायरॉइडची समस्या स्त्रियांच्या मासिक पाळीवरही परिणाम करते. सोबतच कोलेस्ट्रॉल वाढून आपल्याला हृदयाचे आजारही होऊ शकतात.
काय आहेत उपाय? : वजन कमी करताना फॅटबरोबर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन ठेवा. थायरॉइडची अनेक लक्षणे पोषक पदार्थांच्या सेवनाने दूर होऊ शकतात. या आजारात आयर्नची कमतरता भासते. ती भरून काढणारे पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा