ठाणे, दि. २९ जून २०२०: पावसाळ्यास सुरुवात होताच धावपटू, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना वेध लागतात ते ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे. राज्यासह ठाणे शहरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने “ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन” ही वार्षिक स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. सोमवारी शहर महापौर नरेश म्हस्के यांनी एका रेकॉर्ड केलेल्या संदेशात ही घोषणा केली.
ते म्हणाले की, “गेली तीन दशके शहरात मॅरेथॉन अखंडपणे आयोजित केली जात आहे. परंतु यावर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हाला हे रद्द करणे भाग पडले आहे. मॅरेथॉन दरम्यान सामाजिक अंतर आणि गर्दी टाळणे शक्य होणार नाही आणि म्हणूनच ती रद्द केली जात आहे.”
ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका आयोजित करते. दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये देशातील आणि देशाबाहेरील तब्बल २५ हजार ते ३० हजार खेळाडू सहभागी होत असतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी