गोल पोस्ट समाजकारण राशिन येथे भाजी विक्रेत्यांना जागा दिल्याने भाजी विक्रेत्यांनी मानले आभार

राशिन येथे भाजी विक्रेत्यांना जागा दिल्याने भाजी विक्रेत्यांनी मानले आभार

राशिन, दि. २५ जून २०२० : राशिन येथे भाजी विक्रेत्यांना ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक भाजी विक्रेत्यांनी राशिन ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. काल दिनांक २४ रोजी ग्रामपंचायतीने विशेष सभा घेऊन भाजी विक्रेत्यांसाठी जागा देण्याचा निर्णय घेतला.

ग्रामपंचायतीने सर्व भाजी विक्रेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री जगंदबा मंदिराच्या दरम्यानच्या जागेवर सुरक्षित अंतरावर जागा उपलब्ध करून दिली आहे . शहरातील नागरिकांची होणारी गैरसोय व भाजी विक्रेत्यांची होणारी कुचंबणा यावरुन मार्ग काढत ग्रामपंचायतीच्या सरपंच निलम साळवे उपसरपंच शंकर देशमुख आणि सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य याबाबत लक्ष घालत सदर जागा उपलब्ध करून दिली.

भाजी विक्रेत्यांनी सुरक्षित अंतर ठेवून भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय करावा आशा देखील सुचना दिल्या आहेत. सर्व भाजी विक्रेत्यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल राशिन ग्रामपंचायतीचे सरपंच निलम साळवे उपसरपंच शंकर देशमुख सर्व सदस्य यांचे आभार व्यक्त केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version