ठाणे: ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या २१ नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे. या पदासाठी शनिवारी दुपापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. ठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांनी महापौर तर शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांनी उपमहापौर पदासाठी शनिवारी अर्ज दाखल केले.
दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळेस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महापौर पदावर म्हस्के यांची तर उपमहापौर पदावर कदम यांची बिनविरोध निवड झाली असून येत्या २१ नोव्हेंबरला दोघांच्या निवडीची घोषणा केली जाईल.