१२ वर्षाच्या मुलाने शेअर बाजारातून मिळविला ४३ टक्के नफा

15

दक्षिण कोरिया, १० फेब्रुवरी २०२१: एका १२ वर्षाच्या मुलाने मागील वर्षी रिटेल ट्रेडिंग अकाऊंट उघडण्यासाठी त्याच्या आई कढे हट्ट धरला. इतकेच नाही तर त्यानी स्टॉक मार्केटमध्ये पालकांना १६ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास उद्युक्त केले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या मुलाने केवळ एका वर्षात सुमारे ४३ टक्के नफा मिळविला आहे.

केवळ एका वर्षात किशोरवयीन मुलाने ४३ टक्के नफा मिळविण्याची ही घटना दक्षिण कोरियामधील आहे. या मुलाचे नाव क्वन जून आहे. जूनला पुढील वॉरेन बफे बनण्याची आस आहे. अमेरिकेचे वॉरेन बफे सध्या जगातील आठवे श्रीमंत व्यक्ती आहे आणि ते शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी प्रसिद्ध आहे.

क्वान जूनने मायक्रो चीप बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी काकाओ कॉर्प, सॅमसंग आणि ह्युंदाई मोटर या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले. क्वान जून म्हणाला की, तो दीर्घकालीन गुंतवणूकीवर लक्ष केंद्रित करत आहे. तो १० ते २० वर्षे पैसे गुंतवत आहे जेणेकरुन जास्तीत जास्त लाभ मिळू शकेल. तथापि, लहान वयात क्वान जून हा एकमेव ट्रेडिंग करणारा नाही. कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात बऱ्याच तरुण लोकांनी क्वान जूनप्रमाणे स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात केली.

क्वान जूनची आई ली वूल जू म्हणाल्या की, ” आज महाविद्यालयीन पदवी जास्त महत्त्वाची राहिली आहे का?” क्वान जूनच्या यशात त्याच्या आईनेही खूप योगदान दिले आहे कारण त्यांनी आपल्या मुलाला शिकवणीत पाठवण्याऐवजी त्यांच्या उत्कटतेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे