पुणे, २६ ऑक्टोबर २०२०: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह आणि माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ तर्फे कोथरूड, पुणे येथे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली-जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज विश्वशांती पर्यावरण प्रकल्प, इको-पार्कच्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या ज्ञान व विश्वशांतीचे प्रतिक असलेले सुमारे १६० फूट उंचीचे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर ज्ञान कारंजे (Divine Knowledge Fountain) आणि संत श्री तुकाराम विश्वशांती कारंजे (World Peace Fountain) यांचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी विधानपरिषद अध्यक्ष श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, ह.भ.प.श्री. बापूसाहेब मोरे देहूकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, माईर्स एमआयटीचे विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एन.टी. राव, सौ. उषा विश्वनाथ कराड, पं.वसंतराव गाडगीळ आणि राहुल सोलापूरकर हे उपस्थित होते.
पुण्याच्या वैभवात भर घालणारी ही विश्वशांती टेकडी म्हणून उदयास येणार आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर शक्य तेवढे कार्य करेल. शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय अशी ओळख निर्माण करणारी एमआयटी संस्थेने शिक्षण, विज्ञान आणि अध्यात्माला जोड देऊन नवीन संगम घडविलेला येथे पाहवयास मिळतो, असे मत मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे .