मुंबई, २३ फेब्रुवरी २०२१: दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार मोहन देलकर यांचा मृतदेह सोमवारी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सापडला. मोहन देलकर यांचा मृतदेह मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात हॉटेलमध्ये सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिस, ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले.
खासदार मोहन देलकर यांच्याकडून गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोटही पोलिसांना मिळाली आहे. तर सुरुवातीच्या तपासात आत्महत्येचे हे प्रकरण नोंदवले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन देलकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ते हॉटेल सी ग्रीनच्या पाचव्या मजल्यावरील एका खोलीत थांबले होते.
सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टमनंतरच कळू शकेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार मोहन देलकर हे त्यांच्या काही कामांच्या संदर्भात मुंबईत आले होते. तेथून त्यांच्या समर्थकांनी मोहन देलकर यांच्या मृत्यूची बातमी दिली.
सध्या परिसरातील डीसीपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान, खासदार मोहन देलकर यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आले. जेथे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त सत्यनारायण चौधरी असे बरेच वरिष्ठ पोलिस उपस्थित होते. मुंबई पोलिस अधिकारी हॉटेल कर्मचार्यांची चौकशी करत दलेकर कोठे राहत होते याविषयी माहिती गोळा करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव